गुढीपाडवा…
या दिवशी… शकांनी हुणांचा पराभव केला. शालिवाहनाने शत्रुवर विजय मिळवला व या दिवसापासुन “शालिवाहन शक” सुरु झाले.
असं म्हणतात की याच दिवशी ब्रम्हदेवाने सॄष्टीची निर्मिती केली.
अशा या मंगलदिनी, मंगल कामना करु.
चांगल्या विचारांसाठी, मनाची दारे उघडी करु.
चिंतन करण्यासाठी वेळ काढु.
संघर्षापासुन पळुन न जाता, संघर्षाशी हातात हात मिळवुन पुढे जाऊ.
जाणत्या व्यक्तिंशी संवाद करा,
लहानांच्या चुका माफ करा,
नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
तुमच्यासाठी येणारे नवीन वर्ष सुखाचे, समॄध्दीचे जावो हिच ईच्छा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..