तिला माझी एकही कविता कळत नाही
Tag: marathi
Me – Ek Shabd…
“मी” – एक शब्द!
कवी – सौरभ वैशंपायन
Pivala Gulab
पिवळा गुलाब
कवीयत्री – स्वप्ना
Ekhadach Asato
एखादाच असतो…
Dadhi – Ek Swargasukh
दाढि करण्याइतके स्वर्गसुख कशातच नाही. हे मला कळुन चुकले. एरव्ही मी २-३ दिवसांनी दाढि करतो. पण का कुणास ठाऊक, मला हा नियम तोडवासा वाटला. १५ दिवस मी दाढि केली नाही. ज्यांनी मला ह्या दिवसांत बघितले त्यांनी वेड्यात काढले. एव्हाना तुम्हीही १५ दिवस दाढि न केलेला माणुस कसा दिसत असेल हे मनात बघत असाल. अगदी तसाच…. आज सकाळी ऊठल्यावर आरशात तोंड बघितले. कदाचित आरसा सुद्धा मला बघु इच्छित नव्हता (एरव्ही थोडाच बघु इच्छितो). अथक प्रयत्न केल्यानंतर शेवटि दाढि पुर्ण झाली. तुम्हाला सांगतो, स्वर्गात गेल्यासारखे वाटले.
पण खरी मजा आली ती लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यात. दाढि वाढवल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया म्हणजे प्रेमात वेडा झाल्याची. कोण रे ती?? काय म्हटले तिने?? मनावर घेऊ नकोस. हसण्यासाठी चांगले खाद्य मिळाले. काहिंनी मला साधु होतोस की काय हा प्रश्न सुद्धा केला. म्हणजे साधु होण्यासाठी दाढि असावी लागते. ज्यांनी कधी दाढी वाढवली नसेल त्यांनी एकदा वाढवुन बघा. अर्थात हे फ़क्त पुरुषांसाठीच.